'फोर्ब्स' टॉप 10 शक्तीशाली महिलांमध्ये चार भारतीय

'फोर्ब्स मॅगझिन'ने जाहीर केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत चार भारतीय महिलांचा समावेश आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी जर्मन चान्सलर एन्जेला मर्केल आहेत. 

Updated: May 27, 2015, 06:42 PM IST
'फोर्ब्स' टॉप 10 शक्तीशाली महिलांमध्ये चार भारतीय title=

नवी मुंबई: 'फोर्ब्स मॅगझिन'ने जाहीर केलेल्या जगातील 100 सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत चार भारतीय महिलांचा समावेश आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी जर्मन चान्सलर एन्जेला मर्केल आहेत. 

भारतातील एसबीआय चीफ अरुंधती भट्टाचार्य, आयसीआयसीआय बॅंकेच्या प्रमुख चंदा कोचर, बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार-शॉ आणि एटी मिडियाच्या चेअरपर्सन शोभना भरतिया यांचा समावेश आहे. तसेच भारतीय वंशाच्या पेप्सिको कंपनीच्या प्रमुख इंदिरा नुई आणि सिस्कोच्या चीफ टेक्नोलॉजी अॅंड स्ट्रेटेर्जी ऑफिसर पद्मश्री वॉरिअर यांच नावदेखील या यादीत आहे. 

फोर्ब्सच्या या यादीत सीईओ, राजकारणी, सेलिब्रिटी, मॉडल्स, समाजसेवी यांचा समावेश आहे. या यादीत भट्टाचार्य 30व्या, कोचर 35व्या, मजूमदार 85व्या आणि भरतिया 93व्या स्थानी आहेत.

फोर्ब्स टॉप 10 शक्तीशाली महिला

1. एंजेला मर्केल - जर्मन चान्सलर
2. हिलेरी क्लिंटन - राजकारणी
3. मेलिंडा गेट्स - समाज सेवी
4. जेनेट येलेन - फेडरल रिजर्वच्या चेअरपर्सन
5. मॅरी बॅरा - जीएमच्या सीईओ
6. क्रिस्टीन लगार्डे - आईएमएफ प्रमुख
7. डिलमा रॉसेफ - ब्राजीलच्या राष्ट्रपती
8. शॅरिल सॅंडबर्ग - फेसबुक सीओओ
9. सुसॅन वोजसिकी - यूट्यूब सीईओ
10. मिशेल ओबामा - अमरीकेच्या फर्स्ट लेडी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.