पणजी : कपडे घालण्याच्या कारणावरून सतत वाद निर्माण होणाऱ्या गोव्यात आता नवा वाद निर्माण झालाय. गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचलनालयानं, आपल्या कर्मचाऱ्यांना टाईट जीन्स तसंच टीशर्ट आणि बाह्या विरहित तंग कपडे घालण्यावर बंदी घातलीय.
याबाबत तसं पत्रकच या विभागानं काढलंय. भाजपचा हा छुपा अजेंडा असल्याचा आरोप यावर विरोधी पक्षानं केलाय. गोव्यातल्या बीचवर बिकिनी घालण्यावरून निर्माण झालेला वाद मिटत नाही तोच, आता हा नवा वाद निर्माण झालाय.
या विभागाला मिळालेल्या आय एस ओ प्रमाणपत्राचं निमित्त पुढे करत, कला आणि संस्कृती संचलनालयानं हा आदेश काढलाय. तशी माहितीच विधीमंडळाच्या अधिवेशनात लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली गेली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.