ब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!

तीन वर्षांहूनही लहान एका चिमुरडीनं एका असा कारनामा करून दाखवलाय जो भल्याभल्यांना अजून जमलेला नाही. या चिमुरड्या चॅम्पियनचं नाव आहे शिवानी चेरुकुरी... 

Updated: Mar 25, 2015, 03:49 PM IST
ब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड! title=

विजयवाडा : तीन वर्षांहूनही लहान एका चिमुरडीनं एका असा कारनामा करून दाखवलाय जो भल्याभल्यांना अजून जमलेला नाही. या चिमुरड्या चॅम्पियनचं नाव आहे शिवानी चेरुकुरी... 

आंध्रप्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या तिरंदाजी स्पर्धेत तीन वर्ष वयालाही नऊ दिवस कमी असलेल्या शिवानीनं नवा राष्ट्रीय रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय. 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस'चे प्रमुख विश्वरुप रॉय चौधरी यांनी ही माहिती दिलीय.  

पात तसंच सात मीटर दूरवरून तिरंदाजी करत 200 हून अधिक अंक मिळवणारी शिवानी सर्वांत कमी वयाची भारतीय बनलीय. शिवानीनं या स्पर्धेत एकूण 388 अंक आपल्या नावावर केलेत. असा कारनामा करून दाखवणारी देशातील सर्वात कमी वयाची खेळाडू बनलीय. हा एक असा रेकॉर्ड ठरलाय जो तोडणं खूप कठिण आहे. 

शिवानी चेरुकुरी हिचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झालाय. तिच्या मोठ्या भावाचा मृत्यू 2010 मध्ये एका अपघातात झाला होता. तिचा भाऊ एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तिरंदाज आणि कोचही होता. यापूर्वी, शिवानीच्या मोठी बहिणीचाही 2004 मध्ये मृत्यू झाला होता. शिवानीचे वडील चेरुकुरी सत्यनारायण हे देखील तिरंदाजी अकादमी चालवतात. 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अवघ्या तीन वर्षांच्या या चिमुरडीनं पाच मीटर आणि सात मीटर अंतरावरून 24 प्रयत्नांमध्ये आपले सगलेच 72 तीर निशाण्यावर लगावलेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.