नवी दिल्ली : नोयडात युवतीवर बलात्कार केल्यानंतर तिचा व्हिडीओ व्हॉटसअॅपवर प्रसारीत करण्यात आला आहे, महाविद्यालयात शिकणाऱ्या या युवतीवर बलात्कार केल्याचा हा व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
लखनावली गावातील महाविद्यालयीन युवती घरी परतत होती. या युवतीचे तीन जणांनी अपहरण केले. यानंतर एका पडक्या घरात नेऊन गुंगीचे औषध दिले. तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
मोबाईलवरून व्हिडिओ शूटिंग
एवढ्यावरचं हे नराधम थांबले नाहीत, एकाने मोबाईलवरून व्हिडिओ शूटिंग केले. पुढे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊ लागले होते. यानंतर एकाने युवतीला अवैध शस्त्रास्त्रे पोचविण्याची जबाबदारी सोपविली. मात्र युवतीने नकार दिला.
युवतीने नकार दिल्यानंतर त्या युवकांनी हा व्हिडीओ व्हॉटस अॅपवर अपलोड केला, आणि काही वेळातच तो व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी युवतीने तक्रार दिली आहे. आरोपींना पकडण्याचे आटोकाट प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.