स्टेट बँक ऑफ इंडियात ५ बँकांचे होणार विलिनीकरण

देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ५ सहयोगी बँकांचं मुख्य बँकेमध्ये विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं आज हिरवा कंदील दाखवला.

Updated: Jun 15, 2016, 11:27 PM IST
स्टेट बँक ऑफ इंडियात ५ बँकांचे होणार विलिनीकरण title=

नवी दिल्ली : देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ५ सहयोगी बँकांचं मुख्य बँकेमध्ये विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं आज हिरवा कंदील दाखवला.

स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ मैसूर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद यांच्यासह अवघ्या तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारतीय महिला बँकेचंही स्टेट बँकेमध्ये विलिनीकरण होणार आहे.

कॅबिनेटनं तत्वतः मंजुरी दिल्यानंतर आता बँकांच्या विलिनीकरणाचं धोरण लवकरच निश्चित होईल, अशी माहिती दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.

मात्र SBIच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सगळ्याच स्टेट बँकांसाठी ही विन-विन स्थिती असल्याचं म्हटलंय. या विलिनीकरणानंतर स्टेट बँक ही जगातल्या ५० मोठ्या बँकांमध्ये स्थान मिळवेल. विलिनीकरणानंतर स्टेट बँकेची मालमत्ता तब्बल ३७ लाख कोटी रुपयांच्या घरात जाईल. साडेबावीस हजार शाखा आणि ५० कोटी ग्राहक बँकेकडे असतील.