पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ

पेट्रोल ५ पैशांनी तर डिझेल १ रुपये २६ पैशांनी महागले आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

ANI | Updated: Jun 15, 2016, 09:27 PM IST
पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ  title=

नवी दिल्ली : पेट्रोल ५ पैशांनी तर डिझेल १ रुपये २६ पैशांनी महागले आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आलेय. त्यामुळे आता पेट्रोलसाठी प्रतिलीटरमागे ५ पैसे आणि डिझेलसाठी प्रतिलीटरमागे १.२६ रूपये जादा मोजावे लागणार आहेत.