चंदिगड : हरियाणातील भाजप सरकारमधील कृषिमंत्री ओमप्रकाश धनखड यांनी आत्महत्या करणारा शेतकरी भित्रा असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
केंद्र सरकारच्या भूसंपादन विधेयकाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असताना आता भाजप नेत्याकडूनच असे वक्तव्य करण्यात आले आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे प्रचंड नुकसान झालेला शेतकरी आत्महत्या करत असताना, कृषिमंत्री धनखड यांना बुधवारी शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्यांबाबत विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले.
धनखड म्हणाले, की आत्महत्या करणारे लोक भेकड असतात. तो एक गुन्हा असून, सरकार अशा नागरिकांसोबत नाही.
दिल्लीत आम आदमी पक्षाच्या रॅलीत शेतकऱ्याने केलेल्या आत्महत्येवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजकारण करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.