नवी दिल्ली : कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आता देशाचे 'नवे सेन्सॉर बोर्ड' झाले असल्याची टीका केली आहे. पाकिस्तानच्या कलाकारांची भूमिका असलेला 'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रदर्शनाला मान्यता दिल्यानंतर ही टीका होत आहे.
‘मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा आणि घटनेचा अवमान केला आहे, असं कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.
सूरजेवाला म्हणाले, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी लोकशाहीची खिल्ली उडविण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वैराचारी गुंड, त्यांच्याशी जुळवून घेणारे चित्रपट निर्माते, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तडजोड करीत असताना त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी दलाली केली.
'मुख्यमंत्री फडणवीस हे देशातील 'नवे सेन्सॉर बोर्ड' बनले आहेत', अशी टीका सूरजेवाल यांनी केली.