नवी दिल्ली : भारतात फिरण्यासाठी आलेल्या एका विदेशी मॉडेलला रामनामाचा दुपट्टा काढल्यानंतर ताजमहालात प्रवेश दिला गेल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमासाठी या मॉडेल भारतात आल्या आहेत. अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा ३४ देशांमधल्या तब्बल ४६ मॉडेल्सनी यावेळी ताजमहलला भेट दिली. त्यांच्या गळ्यात रामनाम लिहिलेले दुपट्टे असल्याने त्यांना ताजमहलात प्रवेश नाकारण्यात आला. दुपट्टे काढल्यानंतरच त्यांना सुरक्षा रक्षकांनी ताजमहालात प्रवेश दिला.
स्थानिक हिंदुत्ववादी नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. हिंदु जागरण मंचाच्या सदस्यांनी गुरुवारी आग्रा येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाच्या बाहेर या घटनेविरोधात निदर्शनं केली.
गाइडों ने ताजमहल में एंट्री करने से पहले विदेशी महिला का दुपट्टा सिर्फ इसलिए उतरवा लिया क्यूंकि उसका रंग भगवा था, कोई समझाएगा क्यों? pic.twitter.com/faWmzItWjf
— Bhaiyyaji (@bhaiyyajispeaks) April 20, 2017