यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा भीतीदायक अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज वर्तविला. 

Updated: Jun 2, 2015, 10:18 PM IST
यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज title=

नवी दिल्ली : देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा भीतीदायक अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज वर्तविला. 

यंदा सरासरीच्या ८८ टक्के इतकाच पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीत सांगितले. यापूर्वी सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.

नैर्ऋत्य मोसमी पावसावर विपरीत परिणाम करणाऱ्या अल्‌ निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस ९६ टक्‍क्‍यांचीही सरासरी गाठू शकणार नाही. भारतात सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. 

गेल्यावर्षी देशात ९५ टक्के म्हणजे सरासरीच्या ११.९ टक्के कमी पर्जन्यवृष्टी झाली होती. आता यामध्ये आणखी घट झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.