नवरात्रात डॉमिनोजकडून उपासाचा पिझ्झा

येत्या नवरात्रात डॉमिनोजचा उपासाचा पिझ्झा ग्राहकांना मिळणार आहे.

Updated: Sep 12, 2016, 08:56 PM IST
नवरात्रात डॉमिनोजकडून उपासाचा पिझ्झा  title=

मुंबई : येत्या नवरात्रात डॉमिनोजचा उपासाचा पिझ्झा ग्राहकांना मिळणार आहे. खप वाढवण्यासाठी डॉमिनोजनं ही नवी शक्कल लढवली आहे. तसंच नवरात्रात डॉमिनोजच्या पाचशे आऊटलेटसमध्ये फक्त व्हेज पिझ्झा मिळणार आहे.  

नवरात्रादरम्यान दरवर्षी फास्टफूड आऊटलेटसचा खप कमी होतो. हा खप वाढवण्यासाठी डॉमिनोजनं हे निर्णय घेतलेत. डॉमिनोजच्या उपासाच्या पिझ्झ्यामध्ये पिझ्झा बेस हा शिंगाड्याच्या पीठाचा असणार आहे, तर त्यावर साबुदाणा, शेंगदाणा आणि चीझचं टॉपिंग असणार आहे.