विमान प्रवासावेळी सॅमसंग नोट 7 वर निर्बंध

सॅमसंग नोट 7मध्ये चार्जिंगवेळी स्फोट झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.

Updated: Sep 9, 2016, 09:03 PM IST
विमान प्रवासावेळी सॅमसंग नोट 7 वर निर्बंध  title=

मुंबई : सॅमसंग नोट 7मध्ये चार्जिंगवेळी स्फोट झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. यावर खबरदारीचा उपाय भारतीय हवाई वाहतूक संचलनालयानं घेतला आहे. भारतामध्ये विमान प्रवासावेळी सॅमसंग नोट 7 वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. 

हवाई वाहतूक संचलनालयाच्या परिपत्रकानुसार चेक इन लगेजमध्ये हा मोबाईल नेण्यात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, तर प्रवासादरम्यान नोट 7 स्विच ऑफ करून ठेवावा लागणार आहे. 

याआधी अमेरिकेच्या फेडरल एव्हियेशन अॅडमिनिस्ट्रेशननं अशाच प्रकारे नोट 7वर निर्बंध घातले होते. ऑगस्ट महिन्यात सॅमसंगनं नोट 7 लॉन्च केला होता. जगभरातून या मोबाईलचा स्फोट झाल्याच्या 35 तक्रारी आल्यानंतर सॅमसंगनं बाजारातून 25 लाख मोबाईल परत मागवले.