दिल्ली पोलिसांची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

 हा धक्कादायक व्हिडीओ दिल्ली पोलिसांचा प्रताप आहे.

Updated: Feb 1, 2016, 03:30 PM IST
दिल्ली पोलिसांची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण title=

नवी दिल्ली :  हा धक्कादायक व्हिडीओ दिल्ली पोलिसांचा प्रताप आहे. (धक्कादायक व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली) 

हैदराबादेचा विद्यार्थी रोहित वेमुल्लासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी अशी मारहाण केली आहे. महिला आंदोलकानाही पोलिसांनी मारहाण केली.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, गणवेशात नसलेले काही जणही या विद्यार्थ्यांना मारहाण करत असताना दिसत आहे.

दिल्ली हे संघराज्य असल्याने दिल्ली पोलिसांचं नियंत्रण हे केंद्र सरकारकडे आहे, त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या या लाठीमार आणि मारहाणीवर नरेंद्र मोदी, आणि केंद्रीय गृहमंत्रालय काय कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.