सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली दिसून येत असून सोने प्रती १० ग्रॅमला २८,९१० रुपये भाव घाली आलाय. स्थानिक बाजारात सोने दरात ही घसरण पाहायला मिळाली.

Updated: Feb 23, 2016, 05:32 PM IST
सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण title=

नवी दिल्ली : सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली दिसून येत असून सोने प्रती १० ग्रॅमला २८,९१० रुपये भाव घाली आलाय. स्थानिक बाजारात सोने दरात ही घसरण पाहायला मिळाली.

दागिणे बनविणाऱ्या सराफा बाजारातून सोन्याला कमी मागणी असल्याने सोने दरात घट झालेली दिसून येत आहे. आज ६० रुपयांनी सोने दरात घसरण पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरात वाढ झालेली दिसून आली. चांदीला मागणी असल्याने चांदी १५० रुपयांनी वाढून ३७,२५० रुपये किलोचा भाव होता.

सोने मागणीत घट झाल्याने याचा परिणाम सोने दरावर झालाय. दागिणे बाजारात मागणीत घट झाल्याचे दिसून येत आहे. परदेशात सोने दर मजबूत पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने दरात होणारी घसरण थोडी थांबली. सिंगापूरमध्ये सोने १२.१० डॉलर झाली.

राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्ध सोने दर ६०-६० रुपयांनी घसरला. २८,९१० रुपये आणि २८७६० रुपये प्रति १० ग्रॅम तोळा होता. गेले दोन दिवस सोने दरात थोडी घसरण पाहायला मिळत आहे.