ना खाऊंगा, ना खाने दुंगा...असा नारा देणारे मोदी घोटाळ्यावर गप्प का? : राहुल गांधी

ना खाऊंगा, ना खाने दुंगा...असा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात DDCA च्या घोटाळ्याबद्दल आवाज उठवणारा खासदारच निलंबित झालाय. यावर मोदी गप्प का? असा सवाल आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाआहे.

Updated: Dec 24, 2015, 05:46 PM IST
ना खाऊंगा, ना खाने दुंगा...असा नारा देणारे मोदी घोटाळ्यावर गप्प का? : राहुल गांधी title=

लखनऊ : ना खाऊंगा, ना खाने दुंगा...असा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात DDCA च्या घोटाळ्याबद्दल आवाज उठवणारा खासदारच निलंबित झालाय. यावर मोदी गप्प का? असा सवाल आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाआहे.

राहुल गांधी सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. सध्या अरुण जेटलींवर DDCAच्या घोटाळ्याप्रकरणी भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी आरोप केले. त्यानंतर कीर्ती आझाद यांना भाजपमधून काढून निलंबित करण्यात आले आहे.

त्यावर आज राहुल गांधींनी टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजिद मेमन यांनीही आझाद यांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणे गैर आहे का, असा सवाल करत या प्रकरणी पंतप्रधान लक्ष घालतील, असा विश्वास आझाद यांनी व्यक्त केला आहे.