गंगा नदीवर तरंगताना सापडल्या लाखोंच्या नोटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर काळा पैसा जमवलेल्या लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. देशात वेगवेगळ्या ठिकाणी नोटा सापडत आहेत. 500 आणि 1000 च्या नोटा मिळल्याच्या अनेक घटना आता समोर येत आहे.

Updated: Nov 11, 2016, 04:51 PM IST
गंगा नदीवर तरंगताना सापडल्या लाखोंच्या नोटा title=

मिर्जापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर काळा पैसा जमवलेल्या लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. देशात वेगवेगळ्या ठिकाणी नोटा सापडत आहेत. 500 आणि 1000 च्या नोटा मिळल्याच्या अनेक घटना आता समोर येत आहे.

मिर्जापूरमधील कोतवाली येथील नारघाटजवळ काही नोटा सापडल्या आहे. 1000 च्या लाखो नोटा गंगा नदीत तरंगताना सापडल्या आहेत. लोकांना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली.

आज सकाळी जेव्हा लोकं सकाळी अंघोळीसाठी गंगा नदीवर गेले तेव्हा तेथे नोटा पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. नदीवर अनेक नोटा तंरगत होत्या. नोटा फाडून नदीमध्ये टाकण्यात आल्या होत्या.