मुलीच्या जीन्स घालण्यावर, फोन वापरण्यावर बंदी

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील जाडवाड गावात पंचायतीनं एक अजब फतवा काढलाय. गावातील मुलींच्या जीन्स घालण्यावर आणि मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आलीय. 

Updated: Aug 9, 2014, 05:26 PM IST
मुलीच्या जीन्स घालण्यावर, फोन वापरण्यावर बंदी title=

मुजफ्फरनगर/उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील जाडवाड गावात पंचायतीनं एक अजब फतवा काढलाय. गावातील मुलींच्या जीन्स घालण्यावर आणि मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आलीय. 

जीन्स घालण्याचा आणि मोबाईल फोन वापरण्याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो. तसंच त्याच्यामुळं छेडछाडीच्या घटनांना वाव मिळतो. तसंच समाजातील नागरीकांनी लग्नसमारंभात डीजे वाजवू नये, असंही सांगण्यात आलंय. 

पंचायतीचे ग्राम प्रधान अशोक कुमार हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या खाप पंचायतीद्वारे पूर्वी असेच निर्णय घेतले गेले, ज्याची खूप निंदा केली गेली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.