पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं- माजी कोळसा मंत्री

कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी कोळसा सचिव पी. सी. पारीखनं सरळसरळ पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. खाण वाटपामध्ये घोटाळा झाला असल्याचं सीबीआयला वाटत असल्यास पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं कारण खाण वाटपाशी संबंधित कागदपत्रांवर पंतप्रधानांनीच स्वाक्षरी केलीय अशी मागणी पी. सी. पारीख यांनी केलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 16, 2013, 01:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी कोळसा सचिव पी. सी. पारीखनं सरळसरळ पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. खाण वाटपामध्ये घोटाळा झाला असल्याचं सीबीआयला वाटत असल्यास पंतप्रधानांनाही आरोपी बनवावं कारण खाण वाटपाशी संबंधित कागदपत्रांवर पंतप्रधानांनीच स्वाक्षरी केलीय अशी मागणी पी. सी. पारीख यांनी केलीय.
सीबीआयनं काल कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी काल पी.सी. पारीख यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी हा आरोप केलाय. भाजपनं पी.सी.पारीख यांच्या वक्तव्याला दुजोरा देत सीबीआय धीम्या गतीनं चौकशी करत असल्याचा आरोप भाजप नेते यशवंत सिन्हांनी केलाय. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सीपीआय नेते गुरुदास दासगुप्तांनी केलीय.
२००५ साली झालेल्या कोळसा घोटाळ्यासंदर्भात ओडिशातील ब्लॉक्सबद्दल आदित्य बिर्ला समूह आणि आणि या समुहातील कंपनी हिंडाल्को यांचे प्रतिनिधी असल्याबद्दल कुमार मंगलम बिर्ला यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलं आहे. याचबरोबर कोळसा घोटाळ्याबदद्ल माजी कोळसा सचिव पी सी पारीख यांच्यावरही एफआयआर दाखल झालं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.