नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला संयुक्त राष्ट्रात दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताचे प्रयत्न पुन्हा एकदा चीनमुळे असफल ठरले.
मसूद अझरला दहशतवादी म्हणून घोषित कऱण्यात यावे असा ठराव भारताने संयुक्त राष्ट्रात मांडला. मात्र चीनने विशेषाधिकाराचा वापर करत हा ठराव रोखून धरला.
याआधीही याच वर्षी मार्चमध्ये चीनने पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार अझरला दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना रोखले होते. एकट्या चीनने भारताच्या ठरावाला विरोध केला होता. तर इतर 14 देशांनी भारताचे समर्थन केले होते.
त्यामुळे पाकिस्तानच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या चीनने भारताच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा खोडा लावलाय.