भारतात बाल विवाह संपण्यासाठी ५० वर्ष लागतील.

 भारतात बाल विवाह पूर्णपणे संपण्यासाठी ५० वर्ष लागतील असं धक्कादायक वक्तव्य युनिसेफने केलं आहे. भारतातील युनिसेफचे बाल सुरक्षा तज्ज्ञ डोरा गियुस्टीने प्रेस ट्रस्टला सांगितलं की, “भारतात मागील दोन दशकात बाल विवाह प्रथा फक्त १ टक्याने कमी झाली आहे. याचा वेग असाच राहिला तर हि प्रथा संपूर्णपणे बंद होण्यासाठी ५० वर्षे लागतील.’’

Updated: Aug 26, 2014, 08:54 PM IST
 भारतात बाल विवाह संपण्यासाठी ५० वर्ष लागतील. title=

कोलकता: भारतात बाल विवाह पूर्णपणे संपण्यासाठी ५० वर्ष लागतील असं धक्कादायक वक्तव्य युनिसेफने केलं आहे. भारतातील युनिसेफचे बाल सुरक्षा तज्ज्ञ डोरा गियुस्टीने प्रेस ट्रस्टला सांगितलं की, “भारतात मागील दोन दशकात बाल विवाह प्रथा फक्त १ टक्याने कमी झाली आहे. याचा वेग असाच राहिला तर हि प्रथा संपूर्णपणे बंद होण्यासाठी ५० वर्षे लागतील.’’

डोरा यांनी देशातल्या या बालविवाह प्रथेबद्दल चिंता व्यक्त करतांना म्हटलं की, ‘‘हा काळ ऐवढा मोठा आहे की तो पर्यंत लाखों मुलींचा बाल विवाह झालेला असेल. 20 ते 24 वर्षाच्या विवाहित महिलांबाबत केलेल्या सर्वेक्षणात असं लक्षात आलं की 43 टक्के महिलांचा विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात झाला आहे. तर प्रत्येक पाच महिलांमागे 2 जणांनी सांगितलं की त्यांचा बाल विवाह झाला होता.’’

संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात म्हटलं गेलं आहे की, बाल विवाह प्रथेत भारतचा सहावा क्रमांक लागतो. जगातल्या प्रत्येक तीन बाल नववधूंमागे एक नववधू भारतात राहते.

युनीसेफच्या एका अधिकाऱ्य़ाने सांगितलं की देशाच्या काही समुदाय आणि गटात आज ही बालविवाह चालतो. या संदर्भात आज ही अनेक गैरसमज आहेत म्हणून ही प्रथा बंद होण्यात वेळ लागतो आहे.

डोरांनी म्हटलं की, ‘‘मुलींना आजही ओझं समजलं जातं आणि त्यांच्यावर गुंतवणूक करणे व्यर्थ मानले जाते. अनेक पिढ्यांपासून मुली युवा अवस्थेत येताच त्यांचे पालक त्यांचा विवाह करतात कारण त्यांना वाटतं की यामुळे ते अत्याचारापासून वाचू शकतील.’’

समुदाय बालविवाह बंदीचे परिवर्तन स्वीकारत नाही. या शिवाय गरीबी ही  विवाहवर होणारा खर्च आणि शिक्षणा व्यतिरीक्त मुलींना मिळणाऱ्य़ा इतर संधींवर बाधा आणते.’

भारत सरकारने आजपर्यंत मुलींसाठी अनेक योजना आणल्या आहेत. पण बाल विवाह रोखण्यासाठी याची काही मदत झाली?

या मुद्यावर डोरा यांनी म्हटलं की, ‘‘एक सर्वेक्षण असं सांगते की या योजनेमुळे मुलींना शिक्षण सुरू ठेवण्यात आणि विवाह उशिरा होण्यात मदत झाली आहे पण याचा प्रभाव दीर्घकालिन नाही राहिला आणि पालकांची मानसिकता बदलण्यातही याची काहीही मदत नाही झाली.’’

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.