महाराष्ट्रासह भारतात व्हेज आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांची यादी जाहीर

वेज आणि नॉनवेज अन्न खाणाऱ्या लोकांची संख्या एका सर्वेमधून जाहीर करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक नॉनवेज खाणारे लोकं हे तेलंगणामध्ये आहेत. सर्वेनुसार ९९ टक्के लोकं येथे नॉनवेज खातात. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने केलेल्या या सर्वेमधून ही माहिती समोर आली आहे. १५ वर्षापेक्षा अधिक लोकांचा यात समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये ९८.८ टक्के पुरु आणि ९८.०६ टक्के महिला मांसाहारी निघाले.

Updated: Jun 13, 2016, 02:03 PM IST
महाराष्ट्रासह भारतात व्हेज आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांची यादी जाहीर title=

मुंबई : वेज आणि नॉनवेज अन्न खाणाऱ्या लोकांची संख्या एका सर्वेमधून जाहीर करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक नॉनवेज खाणारे लोकं हे तेलंगणामध्ये आहेत. सर्वेनुसार ९९ टक्के लोकं येथे नॉनवेज खातात. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने केलेल्या या सर्वेमधून ही माहिती समोर आली आहे. १५ वर्षापेक्षा अधिक लोकांचा यात समावेश करण्यात आला होता. ज्यामध्ये ९८.८ टक्के पुरु आणि ९८.०६ टक्के महिला मांसाहारी निघाले.

तेलंगणानंतर पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, उडीसा आणि केरळचा क्रमांक लागतो. या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकं मांसाहारी आहेत. शाकाहारी राज्यांमध्ये टॉपवर राजस्थान आहे तर त्यानंतर पंजाब आणि हरियाणाचा नंबर लागतो.

मांसाहारींच्या लोकांच्या संख्येत २००४ च्या तुलनेत २०१४ मध्ये ४ टक्क्यांनी घसरण झाली होती. तेलंगणा संस्कृतीमध्ये मीटला आहारात स्थान आहे म्हणून तेथे याची विक्री सर्वाधिक आहे. तेलंगणामध्ये मासांहारी नाश्ता करणारे लोकं अधिक आहे.

महाराष्ट्रात मांसाहारींची संख्या जवळपास ६० टक्के आहे. खालील दिलेल्या यादीमध्ये तुम्ही सर्व राज्यांची माहिती पाहू शकता.