वायुदलाच्या विमानाला अपघात, वैमानिक सुरक्षित

राजस्थानातल्या जोधपूर शहराजवळ आज दुपारी वायूसेनेचं मिग 27 हे विमान कोसळलं. 

Updated: Jun 13, 2016, 01:31 PM IST
 वायुदलाच्या विमानाला अपघात, वैमानिक सुरक्षित title=

जयपूर : राजस्थानातल्या जोधपूर शहराजवळ आज दुपारी वायूसेनेचं मिग 27 हे विमान कोसळलं. 

रहिवासी भागात हे विमान कोसळल्यानं दोन घरांचं नुकसान झालंय. दरम्यान, या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत.

हा अपघात कसा झाला याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती वायुदलाने दिलीये.