शाहरूख खानच्या 'दिलवाले' देशातील विविध शहरात विरोध

किंग खान शाहरुखचा दिलवाले सिनेमा रसिकांच्या भेटीला आलाय.. मात्र काही ठिकाणी दिलवाले सिनेमाला विरोध करण्यात येतोय..

Updated: Dec 18, 2015, 03:02 PM IST
शाहरूख खानच्या 'दिलवाले' देशातील विविध शहरात विरोध  title=

नवी दिल्ली/लखनऊ : किंग खान शाहरुखचा दिलवाले सिनेमा रसिकांच्या भेटीला आलाय.. मात्र काही ठिकाणी दिलवाले सिनेमाला विरोध करण्यात येतोय..

शाहरुखनं देशातल्या असहिष्णुतेच्या मुद्यावर केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी दिल्लीत हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.. 

शाहरुखचा देशद्रोही असा उल्लेख केलेली फलकं घेऊन आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.. तर दुसरीकडे जबलपूरमध्येही दिलवाले सिनेमाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय.. 
भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलंय.. यावेळी आंदोलकांनी शाहरुखविरोधात जोरदार घोषणाबाजी केली... 

इलाहाबाद येथे गुरूवारी भाजप कार्यकर्त्यांनी दिलवालेचा विरोध केला. तसेच मध्य प्रदेशमध्ये दिलवालेच्या डिस्टीब्युटर आणि फिल्म समीक्षक जयप्रकाश चौकसे यांनी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेतली. त्यांना दिलवाले चित्रपट प्रदर्शनावर धमक्या मिळत होत्या. 

गुजरातमधील सूरत शहरात शाहरूखच्या चित्रपटाला विरोध झाला हा विरोध राष्ट्र सेनाने केला. सूरत्या राजहंस थिएटरबाहेर आंदोलन करण्यात आले. १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच गोरखपूर येथे शिवराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाला विरोध केला. 

राजस्थानातील भीलवाडा येथे जोरदारा आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पहिला शो रद्द करण्यात आला. 

वाढत्या असहिष्णूतेवर शाहरूखने वादग्रस्त विधान केल्यामुळे काही हिंदू संघटनांनी धमकी दिली होती की, दिलवाले रिलीज करणाऱ्या थिएटरमध्ये तोडफोड करू... या धमकीनंतर विविध थिएटरने सुरक्षा मागितली होती.