पाटना: लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होऊन घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपची बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत पीछेहाट झाल्याचं चित्र दिसतंय. दहा पैकी चार जागांचे निकाल लागले असून यात आरजेडीनं दोन जागांवर तर भाजपनं दोन जागांवर विजय मिळवलाय.
तर सहा पैकी चार जागांवर आरजेडी-जेडीयूचे उमेदवार आघाडीवर असून तर दोन जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. दहा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लालूंचा आरजेडी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूनं भाजपला रोखण्यासाठी युती केली होती. युती केल्याचा दोघांना फायदा झाल्याचं चित्र सध्या दिसतंय.
तर पंजाबच्या 2 जागांवर काँग्रेस आणि अकाली दल एका-एका जागेवर पुढे आहे. मध्य प्रदेशच्या 3 जागांपैकी भाजप 2 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. तर कर्नाटकात सर्व तीन जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.