‘लव्ह जेहाद’ करून पतीनं ‘तिच्या’ अंगावर कुत्रं सोडलं

राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या तारा सहदेव या तरुणीची एका मुस्लिम तरुणानं आपला धर्म लपवून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे लग्न करून फसवणूक तर केलीच, पण नंतर ‘इस्लाम’ स्वीकारण्यासाठी तिचा अतोनात छळ केला. यासंदर्भात तिनं पोलिसांकडे रीतसर तक्रार केली असून झारखंड राज्य महिला आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Updated: Aug 25, 2014, 08:21 AM IST
‘लव्ह जेहाद’ करून पतीनं ‘तिच्या’ अंगावर कुत्रं सोडलं title=

रांची: राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या तारा सहदेव या तरुणीची एका मुस्लिम तरुणानं आपला धर्म लपवून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे लग्न करून फसवणूक तर केलीच, पण नंतर ‘इस्लाम’ स्वीकारण्यासाठी तिचा अतोनात छळ केला. यासंदर्भात तिनं पोलिसांकडे रीतसर तक्रार केली असून झारखंड राज्य महिला आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

तारा सहदेव हिच्याशी रणजित कोहली नावाच्या तरुणानं आपण मुसलमान असल्याची माहिती दडवून ठेवून गेल्या जूनमध्ये लग्न केलं, पण लग्नानंतर रमजानच्या महिन्यात त्याचं बिंग फुटलं. त्याला ‘इफ्तार’साठी आलेल्या निमंत्रणपत्रांवरून तो रणजित कोहली नसून रकीबुल हुसेन असल्याचं उजेडात आलं.

रकीबुल हुसेन यानं लग्नानंतर तारा सहदेव हिला इस्लामचा स्वीकार करण्यासाठी जबरदस्ती आणि मारझोड सुरू केली. आपण धर्म बदलण्यास नकार दिल्यानंतर रकीबुल हुसेन यानं २० नातेवाईकांना जमवून आपणास बदडून काढलं. तसंच कुत्र्यांना आपले लचके तोडण्यास त्यांनी भाग पाडलं, असं तिनं तक्रारीत नमूद केलंय.

तारा सहदेव हिची कैफियत आपण भेट घेऊन ऐकून घेतली आहे. तिला सर्वतोपरी मदत करण्यात येईल. पोलिसांनी दोषींना अटक करून कडक कारवाई करण्याची गरज आहे, असं झारखंड महिला आयोगाच्या अध्यक्षा महुआ मांझी यांनी सांगितलं.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.