गुजरातच्या पूर्णा नदीत कोसळली भरलेली बस, २० जणांचा मृत्यू

दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात राज्य परिवहनची एक बस पूर्णा नदीत कोसळलीय. 

Updated: Feb 5, 2016, 10:57 PM IST
गुजरातच्या पूर्णा नदीत कोसळली भरलेली बस, २० जणांचा मृत्यू title=

अहमदाबाद : दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात राज्य परिवहनची एक बस पूर्णा नदीत कोसळलीय. 

पूर्णा नदीवरच्या पूलावरून ही बस सरळ खाली नदीत कोसळल्यानं २० जणांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली जातेय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येतेय. 

नवसारीचे पोलीस अधीक्षक एम एस भरदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपा गावाजवळ ही घटना घडलीय. नदीमध्ये बस कोसळल्यानंतर २० जणांचे मृतदेह नदीबाहेर काढण्यात आलेत. 

ही बस नवसारीहून उकाईला जात होती. नक्की किती प्रवासी या बसमधून प्रवास करत होते, याची मात्र अद्याप माहिती मिळालेली नाही. घटनास्थळावरून नवसारी जवळपास २८५ किलोमीटर अंतरावर आहे.

अग्नशमन दल, अॅम्बुलन्स सारख्या सेवा बचाव कार्यात व्यस्त आहेत.