नोएडा : ऑटो एक्सपोच्या दुस-या दिवशी महिंद्रा अँड महिंद्राचा बोलबाला राहिला. पाहुयात कसा होता ऑटो एक्स्पोचा दुसरा दिवस...
ऑटो मोबाईल्सचा महाकुंभ दिल्लीत सुरु आहे. भविष्यात रस्त्यावर धावणाऱ्या अनेक कार्सचा फर्स्ट लूक इथे पाहायला मिळाला.
महिंद्रानं टू सीटर इलेक्ट्रिक कारही लॉन्च केली. ई२ओ स्पोर्ट असं या कारचं नाव आहे. लिथियम ऑयन बॅटरीवर चालणारी ही गाडी केवळ आठ सेकंदांमध्ये 100 किलोमीटरचा वेग गाठू शकते.
महिंद्रानं कमर्शियल व्हेहिकल सेगमेंटमध्ये ब्लेज़ो ट्रकही लॉन्च केलाय. त्याची किंमत २५ ते ३० लाख रुपये इतकी आहे. या ट्रकचं इंजिन भारतात तयार करण्यात आलंय.
टोटोटानं त्यांची फ्लैगशिप 'एमयूव्ही इनोव्हा'ला नव्या लूकमध्ये सादर केलंय. Innova Crysta पहिल्यापेक्षा जास्त मोठी आणि प्रीमियम आहे. तिचा पुढचा भाग पहिल्यापेक्षा जास्त स्लीक आहे.
'फियाट'नं ऑटो एक्सपोमध्ये तीन नव्या गाड्या लॉन्च केल्या. त्यामध्ये Punto Pure, Urban Cross आणि Linea 125S यांचा समावेश आहे. Linea 125S जूनमध्ये बाजारात येईल.