कोलकता: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूनंतर त्यांचं नाव बदलून अंत्यसंस्कार करण्यात आले, असा दावा एका ब्रिटीश वेबसाईटनं केलाय. 1945मध्ये ताइवानमधल्या एका अधिका-यानं नेताजींचं नाव बदलून अंत्यसंस्कार केले असं bosefiles.info या वेबसाईटचं म्हणणं आहे.
हा दावा करताना या वेबसाईटनं ब्रिटनच्या परराष्ट्र खात्यातील फाईलनंबर एफसी 1852.6 चा दाखला दिलाय. नेताजींच्या मृत्यूबाबतची ही फाईल आपण लवकरच जनतेसमोर आणू असंही या वेबसाईटनं सांगितलंय.
दरम्यान याआधीच सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकार नेताजींबाबतच्या फाईल 23 जानेवारीला सार्वजनिक करेल, अशी माहिती पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलीये.