मुंबई : समाजानं उभारलेल्या भिंती न्यायालयामुळे दूर झाल्या आणि नवरा बायकोचं पुन्हा मिलन झाल्याची एक घटना मुंबईत पाहायला मिळालीय.
मुळच्या राजस्थानमधल्या एका मुस्लीम तरुणीनं राजस्थानातल्याच मुकेश देवडा या हिंदू मुलाशी प्रेमविवाह केला होता. मुकेश देवडा मुंबईत नोकरीनिमित्तानं आला असता, राजस्थानात राहत असलेल्या तरुणीचं तिच्या घरच्यांनी बळजबरीनं दुसरं लग्न लाऊन दिलं. या प्रकरणी मुकेश देवडानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यावर निर्णय देताना, तरुणीला देवडाकडे सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयानं राजस्थान पोलिसांना दिले. त्यानुसार सोमवारी राजस्थान पोलिसांनी तरुणीला मुंबईत आणून मुकेश देवडाकडे सोपवलं. आता हे दोघेही अंबरनाथमध्ये राहत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.