जम्मू-काश्मीर: भाजप-पीडीपी सरकार बनवणार

जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेबाबतचा सस्पेंस संपलाय. भाजप आणि पीडीपी मिळून राज्य सरकार स्थापन करणार आहे. २३ फेब्रुवारीपूर्वी सरकार स्थापन केलं जाईल, अशी माहिती मिळतेय. 

Updated: Feb 12, 2015, 08:26 PM IST
जम्मू-काश्मीर: भाजप-पीडीपी सरकार बनवणार title=

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेबाबतचा सस्पेंस संपलाय. भाजप आणि पीडीपी मिळून राज्य सरकार स्थापन करणार आहे. २३ फेब्रुवारीपूर्वी सरकार स्थापन केलं जाईल, अशी माहिती मिळतेय. 

पुढील तीन दिवसांच्या आत मुफ्ती मोहम्मद सईद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये भेट होणार आहे. मुख्यमंत्री पीडीपीचा असेल तर उपमुख्यमंत्री भाजपचा. संसदेच्या बजेट सेशनपूर्वी सरकार स्थापन केलं जाईल. 

डिसेंबरमध्ये झालेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत ८७ पैकी पीडीपीनं २८ तर भाजपनं २५ जागांवर विजय मिळवलाय. एनसी आणि काँग्रेसला क्रमश: १५ आणि १२ जागांवर विजय मिळवता आला. 

निवडणुकीचा निकाल आल्यानंतरच सरकार स्थापनेवरून वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.