नवी दिल्ली : घरगुची गॅस सिलिंडरवर सबसिडी मिळावयास हवी असेल तर अजुनही वेळ गेलेली नाही. तुम्ही तुमचे आधार कार्ड तत्काळ नोंद करा. नाहीतर सबसिडी मिळणे अशक्य होणार आहे.
तुम्ही आधार कार्डचा अर्ज गॅस एजन्सीमध्ये जाऊन भरला नसेल तर पहिला अर्ज भरण्याची संधी आहे. कारण २० दिवसांच्या आत तुम्ही आपले आधारकार्ड जमा करा. नाहीतर गॅस सिलिंडवर मिळणारी सवलत मिळणार नाही.
आपले आधार कार्ड नंबर नोंदविण्यासाठी आता मार्च महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. यामध्ये २० दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर ग्राहक आधार कार्ड नंबर नोंद करणे शक्य होणार आहे. २० दिवसांच्या मुदतीचा गॅस एजन्सी आणि पेट्रोलियम तथा गॅस कंपनी अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.