दिल्ली विधानसभा, आप नॉट आऊट ६७, भाजप सर्वबाद ३

दिल्लीतल्या जनतेची सेवा करायचीय... यासाठी मी खूप छोटा माणूस आहे पण आपण एकत्र हे करून दाखवू... ही दिल्ली सर्वांची आहे - अरविंद केजरीवाल

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 10, 2015, 07:42 PM IST
दिल्ली विधानसभा, आप नॉट आऊट ६७, भाजप सर्वबाद ३ title=

दुपारी २.४० वाजता
- दिल्लीतल्या भाजपच्या पराभवानंतर उद्धव ठाकरे मीडियासमोर
- लोकशाहीचं कौतुक केलं पाहिजे
- अरविंद केजरीवाल यांचं कौतुक करायलाच हवं पण दिल्लीकरांचं कौतुक करायला हवं
- लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते, हे केजरीवालांनी दाखवून दिलं
- जनता मोठी... त्यांना कुणीही गृहीत धरता कामा नये... जनतेला हवं तसंच जनता वागत असते.. हे त्याचंच उदाहरण आहे
- देशातली जनता अस्वस्थ आहे... म्हणूनच दिल्लीत लोकसभा निवडणुकीतल्या निकालाशी विसंगत असा निकाल आता लागलाय.
- दिल्लीकर अमिषाला बळी पडले नाहीत

दुपारी २.०० वाजता
- अरविंद केजरीवाल यांचं 'आरएसएस'कडून अभिनंदन
- भाजपने अंतर्मुख होऊन विचार करावा
- भाजपचा एवढा मोठा पराभव अपेक्षित नव्हता
- पण, आपचं एवढं मोठं यश अनपेक्षित - आरएसएस

दुपारी १२.५५ वाजता
- किरण बेदींना पराभव मान्य... पराभवानंतर पहिल्यांदाच जनतेसमोर
- भाजपनं तिकीट दिल्याबद्दल किरण बेदींनी मानले पक्षाचे आभार...
- निवडणूक लढण्यासाठी भाजपनं माझ्याकडून एक रुपयाही घेतला नाही - किरण बेदी

दुपारी १२.४० वाजता
- नवी दिल्ली  मतदारसंघातून अरविंद केजरीवाल विजयी घोषित
- कृष्णनगर मतदारसंघातून भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार आणि एकेकाळच्या अण्णांच्या सहकारी किरण बेदी पराभू

दुपारी १२.१० वाजता
- आंबेडकर नगर इथून आपचे अजय दत्त विजयी
- बीजवासन मतदारसंघातून 'आप'चे कर्नल सेहरावत विजयी
- बदरपूर इथून आपचे नारायण दत्त विजयी घोषित

दुपारी १२.०० वाजता
अरविंद केजरीवाल आणि आपच्या विजयासाठी मी अभिनंदन करतो... दिल्लीच्या जनतेनं आपला निवडून दिलंय... आणि त्यांच्या मताचा मी आदर करतो - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी

सकाळी ११.४४ वाजता
- दिल्लीतल्या ऐतिहासिक विजयानंतर अरविंद केजरीवाल जनतेसमोर
- दिल्लीतल्या जनतेला सलाम... - अरविंद केजरीवाल
- दिल्लीतल्या जनतेची सेवा करायचीय... यासाठी मी खूप छोटा माणूस आहे पण आपण एकत्र हे करून दाखवू... ही दिल्ली सर्वांची आहे. 
- दिलेली आश्वासनं आम्ही पूर्ण करणार
- भाजप-काँग्रेसचा पराभव अहंकारामुळेच... 
- हा विजय म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे... सर्व आमदारांना आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे... विजयाचा गर्व नको... - अरविंद केजरीवाल- 
- 'पाच साल - केजरीवाल'च्या कार्यकर्त्यांच्या घोषणा
- केजरीवाल यांनी वडील, पत्नीला जनतेसमोर आणलं... 
- पत्नीच्या सहकार्याशिवाय विजय शक्य नव्हता... - अरविंद केजरीवाल 

सकाळी ११.१० वाजता
- काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू
- अजय  माकन यांचा प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा
- लव्हलींचा दिल्ली प्रदेशाध्यपदाचा राजीनामा

सकाळी ११.०० वाजता
- ९० पैंकी ६६ जागांचा कल केवळ 'आप'कडे... भाजपला ३ तर बसपाला १ जागेचा कल
- हा लढा... सकारात्मकता आणि नकारात्मकता असा राहिला...  लोकांना सकारात्मकता भावली... - कुमार विश्वास, आप

सकाळी १०.५० वाजता
- आप ६५, भाजप ३, काँग्रेस ० तर, इतर (बसपा) १ जागेवर आघाडीवर
- जनादेश मिळालाय... अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा... केजरीवाल हे लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे - अजय माकन
- अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा पराभव
- अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा द्यायचा निर्णय मी घेतलाय - माकन

सकाळी १०.४० वाजता
- भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी केलं अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन
- बेदींनी ट्विटरवरून केलं अरविंद केजरीवाल यांचं अभिनंजन
- अरविंद केजरीवाल यांना पैंकीच्या पैकी मार्क... अभिनंदन... आता, दिल्लीला आणखी एका उंचीवर घेऊन जा... दिल्लीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवा... - किरण बेदी यांचं ट्विट

सकाळी १०.३० वाजता
- दिल्लीतल्या ७० पैंकी ७० जागाांचे कल हाती
- आप ६३, भाजप ६, काँग्रेस ० तर, इतर (बसपा) १ जागेवर आघाडीवर
- आपला स्पष्ट बहुमत, भाजपचे विरोधी पक्षनतेपदही अरविंद केजरीवालांच्या हाती
- भाजपला विरोधी पक्षनेतेपदंही मिळणं दुरापास्त
- लोकसभेच्या संकेतानुसार भाजपची दिल्लीत अडचण

सकाळी १०.१५ वाजता
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन
- मोदींनी फोनवरून केलं केजरीवाल यांचं अभिनंदन
- दिल्लीच्या विकासासाठी संपूर्ण पाठिंबा देण्याचं मोदींनी दिलं आश्वासन
- दिल्लीतील आपच्या विजयानंतर मोदी-केजरीवाल यांचा संवाद
- एकत्र चहा घेऊ - मोदी
- शक्यतो लवकरच भेटू - केजरीवाल


अण्णा हजारे पत्रकार परिषदेत

सकाळी १०.१० वाजता
- अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अण्णा हजारेंच्या शुभेच्छा... गुरुनं दिल्या शिष्याला शुभेच्छा
- ही नरेंद्र मोदींची हवा नव्हती आणि नाही... लोकांना जे आश्वासन दिलं होतं त्याचं पालन न केल्यानं विश्वासार्हता कमी झाली... - अण्णा
- लोकपाल कायदा बनलाय तरीही त्याचं पालन केलं जात नाहीय - अण्णा
- शेतकऱ्यांसाठी भयानक असलेलं जमिनी अधिनियम कायदा  - अण्णा
- माझी अरविंदकडे एकच प्रार्थना... पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्यानंतर ज्या चुका झाल्या होत्या त्याची पुनरावृत्ती नको - अण्णा
- मेट्रोमधून प्रवास करणं, रामलीला मैदानात शपथविधी करणं... अशा गोष्टींपेक्षा साध्या गोष्टी करण्याची अपेक्षा केली व्यक्त 
- जनता ही सर्वात मोठी संसद आहे.
- हा तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पराभव - अण्णा हजारे
- दिल्लीकरांचा निर्णय योग्य - अण्णा
- काळं धन भारतात आणण्याचं आश्वासन दिलं होतं... म्हणून गरिबांनीही भाजपला मतं दिली... पण, ना काळं धन भारतात आलं ना गरिबांच्या वाट्याला काही आलं... त्यामुळे विश्वासार्हता कमी झाली - अण्णा
- केजरीवाल यांचं डोकं खूप तेज आहे... 
- मी अरविंद केजरीवाल यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला होता... तेव्हा त्यांनी राजीनामा दिला... पण, नंतर त्यांनी आपली चूक मान्यही केली... म्हणून त्यांची विश्वासार्हता वाढली 
- शेतकरीविरोधी निर्णय घेतला, तर जनता गप्प कशी बसणार?...  अच्छे दिन फक्त उद्योगपतींसाठी म्हणून भाजपला सावध होणं आवश्यक आहे - अण्णा
- मी अरविंदला सांगावं एवढा अरविंद खुळा नाही... मी अनेक वर्ष अरविंदला पाहिलेलं आहे... त्याचा अनुभव जास्त आहे.. माझ्यापेक्षा तो खूप ज्ञानी आहे... खडकपूरचा तो विद्यार्थी आहे...   

सकाळी १०.०५ वाजता

- आम्ही ही कल्पना कधीच केली नव्हती... पण, ठीक आहे... जे आहे ते आहे... या निकालांवर दिल्लीत बसून चर्चा करण्याची गरज आहे - मनोज तिवारी, भाजप नेते

सकाळी १०.०० वाजता
- अरविंद केजरीवाल यांचा १४ फेब्रुवारीला 'दिल्ली व्हॅलेंटाईन'?
- रामलीला मैदानावर केजरीवाल यांचा शपथविधी होण्याची शक्यता

सकाळी ९.५० वाजता
- अरविंद केजरीवाल यांना 'माफी' फळली
- नवे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांना ममतांच्या शुभेच्छा
- ममता बॅनर्जी यांनी केलं 'आप'चं अभिनंदन
- देशाला बदलाची गरज होती - ममता

सकाळी ९.४५ वाजता
- काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.
- प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ - काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आरोळ्या
- 'प्रियांका आँधी है, दुसरी इंदिरा गांधी है'
- काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी 
- दिल्लीतल्या निवडणुका राहुल किंवा सोनिया यांच्या नेतृत्वाखाली नाही तर केवळ अजय माकन यांच्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या - काँग्रेसची सारवासारव

सकाळी ९.४० वाजता
- दिल्लीतली जनता का नाराज आहे यावर विचारमंथन करू - शहनवाज हुसैन, भाजप
- आमची मतं कायम आहेत, काँग्रेसची सगळी मतं आपला मिळाली - शहनवाज हुसैन यांची गुगली  
- पराभवाची जबाबदारी सामूहिक - भाजपला पराभव मान्य

सकाळी ९.३० वाजता
- भाजपपेक्षा 'आप'ला पाचपट जागा
- आप ५१, भाजप ११, काँग्रेस ०, बसपा १ जागांवर आघाडी

सकाळी ९.२० वाजता
- दिल्लीकरांनी मोदींना नाकारलं... भाजपला मोठा धक्का
- गांधी-पवारांना जे जमलं नाही, ते केजरीवालांनी केलं
- आपच्या झाडूनं भाजपचा पुरता सफाया
- दिल्लीमध्ये 'आम आदमी'चा जल्लोष

सकाळी ९.१० वाजता
- कृष्णानगरमधून भाजपच्या किरण बेदी ३०० मतांनी पिछाडीवर
- ५५ जागांचे कल हाती : आप ४२, भाजप १०, काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर

सकाळी ९.०० वाजता
- आपची बहुमताच्या दिशेनं वाटचाल
- बहुमतापासून आप १० जागा दूर
- सदर बाजारातून काँग्रेसचे अजय माकन ७००० मतांनी पिछाडीवर

सकाळी ८.५० वाजता
- दिल्लीत ७० पैंकी ३८ जागांचे कल हाती
- आप २५, भाजप ११, काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर
- तुम्ही नेहमीच सगळ्या लोकांना मूर्ख बनवू शकत नाहीत... इतका माज आणि खोटारडंपणं तुम्हाला विजय मिळवून देऊ शकत नाही... हा बदलावातील महत्त्वाचा टप्पा - आप

सकाळी ८.४० वाजता
- मुंबईमध्ये 'आप' कार्यकर्त्यांचा जल्लोष 
- अजून निकाल येत आहेत... संपूर्ण निकाल हाती आल्यावरच प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल - अजय माकन, काँग्रेस

सकाळी ८.३५ वाजता
- आपला १५, भाजपला ८ तर काँग्रेसचीही २ जागांवर आघाडी 
- नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल आघाडीवर
- पटपडगंजमधून 'आप'चे मनिष सिसोदिया आघाडीवर
- प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी पिछाडीवर
- रोहतासमधून 'आप'च्या सरिता सिंह आघाडीवर 
- दिल्ली कँटमधून 'आप'चे कमांडो सुरेंद्र पुढे
- मेहरौलीमधून आपचे नरेंद्र यादव आघाडीवर

सकाळी ८.३० वाजता
- भाजप आणि आपमध्ये काँटे की टक्कर
- आपला १०, भाजपला ४ तर काँग्रेसचीही २ जागांवर आघाडी 

सकाळी ८.२५ वाजता
- पहिल्या पाच जागांचे कल हाती
- आप तीन जागांवर आघाडीवर तर भाजप दोन जागेवर आघाडीवर
- जनकपुरीमधून आपचे भाजपचे जगदीश मुखी आघाडीवर
- बवानमधून आपचे वेद प्रकाश आघाडीवर
- कृष्णानगरमधून किरण बेदी आघाडीवर

सकाळी ८.१० वाजता
- दिल्लीत पहिलाच कल 'आप'च्या बाजुनं
- मंगोलपुरीमधून आपच्या राखी बिडलान आघाडीवर

सकाळी ८ वाजता
- दिल्ली विधानसभा निवडणूक २०१५ च्या मतमोजणीला सुरुवात

नवी दिल्ली : दिल्लीची गादी कोण जिंकणार? दिल्लीच्या तख्तावर कोण विराजमान होणार? याचा फैसला पुढच्या काही वेळात होणार आहे.

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी शनिवारी झालेल्या मतदानाच्या मोजणीला आता सुरुवात झालीय. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात शहरातील 14 केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. 70 जागांसाठी तब्बल 673 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांच्या भाग्याचा फैसला झालेला असेल. दुपारपर्यंत दिल्लीचं पूर्ण राजकीय चित्र स्पष्ट होईल आणि देशाच्या या राजधानीमध्ये कुणाची सत्ता येणार, याचा निकालही लागेल. 

देशातील सत्ताधारी भाजप विरूद्ध आम आदमी पार्टी अशी ‘काँटे की टक्कर’ इथं रंगणार आहे. दिल्लीकरांनी कधी नव्हे एवढं विक्रमी म्हणजे 67.14 टक्के मतदान केल्यानं उत्सुकता आणखी शिगेला पोहोचलीय. एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर अरविंद केजरीवालांच्या 'आप'ची जादू पुन्हा दिल्लीत पाहायला मिळणार आहे. 

मात्र, भाजपनंही अजून हिंमत कायम ठेवलीय. भाजपला 34 ते 38 जागा मिळतील, असा विश्वास नेत्यांना आहे. ‘दिल्ली जिंकली तर मोदींमुळं आणि पराभव झाला तर माझ्यामुळं’ असं किरण बेदींनी आधीच जाहीर करून टाकलंय. 

आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल आणि भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यासह अजय माकन, महाबल मिश्र, कृष्णा तिरथ, डॉ. ए. के. वालिया, राजकुमार चौहान, चौधरी प्रेम सिंह, मुकेश शर्मा आणि जगदीश मुखी अशा दिग्गजांचं भवितव्य या निवडणुकीत पणाला लागलंय. केंद्रात भाजपचं सरकार असल्यानं भाजपच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही आपली सर्व शक्ती पणाला लावलीय. आता मोदींच्या कामावर भाजपचं 'कमळ' फुलतं की, मोदींच्या स्वप्नावर 'आप'चा झाडू फिरतो, याचा फैसला काही तासांतच होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.