सट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे. 

Updated: Feb 9, 2015, 10:29 PM IST
सट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!  title=

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे. 

काँग्रेसच्या नावावर दोन रुपये दर आहे. सट्टा बाजाराच्या हिशेबानुसार दिल्लीत आपचंच सरकार स्थापन होईल. जर आप सरकार बनवू शकली नाही तर भाजप सरकार बनवेल. 

आघाडी सरकार सत्तेवर येईल अशी शक्यता कमीच आहे. सट्टा बाजाराच्या हिशेबानुसार काँग्रेस सत्ता स्पर्धेत कुठंच नसल्याचं दिसून येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.