'माझे लैंगिक शोषण झाले होते'

प्रसिद्ध टिव्ही पत्रकार बरखा दत्त यांनी आपल्या पुस्तकात धक्कदायक खुलासा केलाय. लहानपणी आपलेही लैंगिक शोषण झाले होते असा खुलासा त्यांनी केलाय. बुधवारी त्यांचे 'This Unquiet Land- Stories from India\'s Fault Lines' हे पुस्तक लाँच झाले. 

Updated: Dec 4, 2015, 11:39 AM IST
'माझे लैंगिक शोषण झाले होते' title=

नवी दिल्ली : प्रसिद्ध टिव्ही पत्रकार बरखा दत्त यांनी आपल्या पुस्तकात धक्कदायक खुलासा केलाय. लहानपणी आपलेही लैंगिक शोषण झाले होते असा खुलासा त्यांनी केलाय. बुधवारी त्यांचे This Unquiet Land- Stories from India\'s Fault Lines हे पुस्तक लाँच झाले. यात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभवांबाबत लिहिले आहे. 

कोणी बाहेरच्या माणसाने नव्हे तर नातेवाईकाकडूनच लैंगिक अत्याचार झाल्याचे बरखा यांनी सांगितले. 'मी त्यावेळी खूप लहान होते. त्यावेळी मला ती गोष्ट समजली नाही. मात्र जसजशी मी मोठी होत गेले त्यावेळी मला समजले की माझ्यासोबत जे झाले ते चुकीचे होते. नातेवाईकाच्या या कृत्याबद्दल मी न घाबरता आईला सांगितले. तेव्हा ताबडतोब त्या नातेवाईला हाकलण्यात आले,' असे बरखा यावेळी म्हणाल्या. यावेळी त्यांनी जीवनातील अनेक आठवणींनाही उजाळा दिला. तसेच पोलीस यंत्रणेवरही त्यांनी टीका केली. 

देशात अनेक मुले आहेत जी लहानपणी लैंगिक अत्याचाराला बळी पडली आहेत. २००७ मध्ये सरकारने लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांची संख्या जाहीर केली होती. या माहितीतून तब्बल ५३ टक्के मुले ही कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला बळी पडल्याचे समोर आल्याचे बरखा यांनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.