नवी दिल्ली : देशातील जनतेला अद्याप जरी 'अच्छे दिन' आले नसले तरी मात्र दिल्लीतल्या आमदारांचे 'अच्छे दिन' आले आहेत. दिल्ली विधानसभेत आमदारांचे वेतन वाढवण्याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आलेय. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दिल्लीच्या आमदारांच्या वेतनात चार पट म्हणजेच ४०० टक्क्यांनी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झालाय. आमदारांच्या वेतन, अलाउंसेस आणि पेन्शनमध्ये चांगलीच वाढ होणार आहे.
एक्सपर्ट कमिटीने आमदारांचे वेतन ८८ हजारांवरुन तब्बल २.१० लाख करण्याची शिफारस केली होती ज्याला मंजुरी देण्यात आलीये. आमदारांसह विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या वेतनातही वाढ करण्याला मंजुरी देण्यात आलीये. वार्षिक प्रवासी भत्त्याची रक्कमही वाढवण्यात आलीये.
यापूर्वी ज्या आमदारांना ५० हजार रुपये मिळत होते त्यांना आता तीन लाख रुपये वेतन देण्यात येणार आहे. दरवर्षी मूळ वेतनात दह टक्के वाढीची शिफारसही करण्यात आलीये. आमदारांचे मूळ वेतन सध्या १२ हजार रुपये आहे ते वाढवून ५० हजार रुपये करण्यात आलेय. म्हणजेच मूळ वेतनात चार पटींनी वाढ कऱण्यात आलीये. तसेच ज्यांचे मूळ वेतन २० हजार रुपये आहे त्यांना ८० हजार रुपये मिळणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.