२०३०पर्यंत भारत जगातला पाचवा मोठा निर्यातदार देश असेल - मोदी

गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात परिषदेला सुरुवात झालीय. तीन दिवसांच्या या परिषदेचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विविध देशांतले राजकीय नेते या परिषदेला उपस्थित आहेत. 

Updated: Jan 11, 2015, 04:37 PM IST
२०३०पर्यंत भारत जगातला पाचवा मोठा निर्यातदार देश असेल - मोदी title=

गांधीनगर: गुजरातमधल्या गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात परिषदेला सुरुवात झालीय. तीन दिवसांच्या या परिषदेचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विविध देशांतले राजकीय नेते या परिषदेला उपस्थित आहेत. 
 
या मंचावरुन बोलताना, नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मेक इन इंडियाचा नारा दिला. सोबतच २०३० पर्यंत भारत जगातला पाचवा मोठा निर्यातदार देश असेल असा विश्वासही वर्तवला. त्याचवेळी फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत, फ्रान्स देशासोबत भारत असल्याची भावनाही मोदींनी यावेळी बोलून दाखवली. 
 

या परिषदेमध्ये जगभरातील उद्योजक सहभागी झाले असून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी, संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून आदी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.