व्हायब्रंट गुजरात: रिलायन्स 1लाख कोटींची गुंतवणूक करणार

मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या मोहीमेमुळं देशभरात एक नवीन उत्साह आल्याचं सांगत रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

Updated: Jan 11, 2015, 04:19 PM IST
व्हायब्रंट गुजरात: रिलायन्स 1लाख कोटींची गुंतवणूक करणार title=

गांधीनगर: मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया या मोहीमेमुळं देशभरात एक नवीन उत्साह आल्याचं सांगत रिलायन उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी गुजरातमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. तर आदित्य बिर्ला समुह, सुझूकी या ख्यातनाम उद्योग समुहांनीही गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्योजकांची पावले आता मोदींच्या गुजरातकडे वळत असल्याचं दिसत आहे. 

गुजरातमध्ये उद्योजकांसाठी व्हायब्रंट गुजरात या परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेमध्ये जगभरातील उद्योजक सहभागी झाले असून अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी, संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून आदी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. 

भारताची अर्थव्यवस्था वेगानं विकासाच्या वाटेवर जाईल अशी आशा मुकेश अंबानी यांनी व्यक्त केली. आदित्य बिर्ला समुहाचे कुमारमंगलम बिर्ला यांनीदेखील गुजरातमध्ये सिमेंट आणि अन्य उद्योगांच्या विस्तारासाठी २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. सुझूक आणि अन्य उद्योजकांनीही गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मेक इन इंडिया या मोहिमेला चालना देण्यासाठी व्हायब्रंट गुजरात ही परिषद मोदींच्या मदतीला धावून आल्याचं दिसतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.