www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीत काँग्रेस आणि भाजपला धक्का देत आम आदमी पार्टीने २८ जागा जिंकत चमत्कार केला. आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. केजरीवाल हे सातवे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबरोबर सहा जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी मेट्रो ट्रेनने प्रवास केला. केजरीवाल यांनी कौशांबीमध्ये जनता दरबारात घेतला. त्यावेळी सांगितले, आमचा पक्ष हा 'आम आदमीचा पक्ष आहे आणि 'आप'चे सर्व आमदारही मेट्रो ट्रेनने शपथविधी सोहळ्याला पोचतील. त्याप्रमाने त्यांनी मेट्रोने प्रवास केला.
अरविंद केजरीवाल आपल्या सहका-यांसोबत व्यासपीठावर उपस्थित होते. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ आणि गोपनीयतेची शपथ दिली. मैं अरविंद केजरीवाल ईश्वर की शपथ लेता हूं, की मैं विधीद्वारा स्थापित भारत के संविधान के प्रती सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा..
मनीष सिसोदिया, सोमनाथ भारती , सत्येंद्र जैन , राखी बिर्ला, गिरीश सोनी आणि सौरभ भारद्वाज या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हे सहा जण केजरीवाल यांचे मंत्रिमंडळतील प्रमुख शिलेदार असणार आहेत.
दिल्लीच्या रामलीला मैदानावर प्रचंड समुदाय उपस्थित होता. कडाक्याच्या थंडीमध्ये केजरीवाल यांच्या शपथविधीला दिल्लीतील नागरिकांनी खास उपस्थिती लावली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.