नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणाऱ्यांसाठी खुशखबर

ज्यांना एलपीजी गॅस कनेक्शन हवं आहे, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार नवीन गॅस कनेक्शनसाठी आता तुमची डोकेदुखी होणार नाही. ही प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार असल्याने तुम्हाला गॅस एजन्सीच्या चकरा मारण्याची वेळ येणार नाहीय. तर ऑनलाईनमुळे तुम्हाला हे सर्व सोपं होणार आहे.

Updated: Aug 21, 2015, 08:44 PM IST
नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेणाऱ्यांसाठी खुशखबर title=

नवी दिल्ली : ज्यांना एलपीजी गॅस कनेक्शन हवं आहे, त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार नवीन गॅस कनेक्शनसाठी आता तुमची डोकेदुखी होणार नाही. ही प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार असल्याने तुम्हाला गॅस एजन्सीच्या चकरा मारण्याची वेळ येणार नाहीय. तर ऑनलाईनमुळे तुम्हाला हे सर्व सोपं होणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार केंद्र सरकार लवकरच ऑनलाईन पद्धतीने गॅस कनेक्शन देणार आहे. या पद्धतीनुसार गॅस कनेक्शन वितरीत केलं जाणार आहे. यात ग्राहकांचा एक फायदा असा होणार आहे की, कुकिंग गॅस स्टोव्ह घेण्याचा कोणताही दबाव ग्राहकांवर नसणार आहे.

नव्या पद्धतीनुसार तेल कंपन्यांच्या साईटवर ग्राहक ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील. यानुसार ४८ तासात ग्राहकाला डीलर निवडण्यासाठी ईमेल आणि मेसेज येतील, ग्राहक आयडी क्रमांकही लगेच उपलब्ध होणार आहे.

ग्राहकाने ऑनलाईन पैसे भरल्यानंतर, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर डीलर रेग्युलेटर, सिलेंडर आणि रबर पाईप नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे, असं सांगण्यात येतंय की ही संपूर्ण प्रक्रिया सात ते आठ दिवसात पार पडणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.