www.24taas.com, झी मीडिया, हैदराबाद
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी मुख्य़मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
लोकसभेत तेलंगणा विधेयक मंजूर झाल्याच्या विरोधात किरणकुमार रेड्डी यांनी हा राजीनामा दिला आहे.
यासह किरणकुमार यांनी आपल्या आमदारकीचा तसेच, काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला.
या आधी आंध्रच्या सहा मंत्र्यांसह काही आमदारांनी मंगळवारीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
लोकसभेत प्रचंड गोंधळात तेलंगणा विधेयक मंजूर करण्यात आलं. राज्यसभेत हे विधेयक बुधवारी सादर करण्यात येणार आहे.
मंगळवारी जेव्हा या विधेयकावर लोकसभेत मतदान होत होतं. तेव्हा लोकसभा टीव्हीवरील प्रसारण रोखण्यात आलं होतं.
लोकसभेत तेलंगणा विधेयक मंजूर झाल्यानंतर, आंध्र प्रदेश आणि सीमांध्र भागात तणाव निर्माण झाला. आंदोलकांकडून मंगळवारी रात्रीपासून प्रदर्शन करण्यात येत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.