चेन्नई : अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर चेन्नईमध्ये आता मदत कार्य सुरू आहे. पण या मदत कार्यात आता नवा वाद समोर आला आहे. एआईएडीएमके पक्षाचे कार्यकर्ते मदत सामग्रीवर जयललिता यांचे स्टिकर लावण्यासाठी दबाव टाकत आहेत. पक्षाने मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे.
जयललिता यांचे समर्थक एनजीओ आणि स्वयसेवकांना अम्मांचे स्टिकर लावण्यास सांगत आहे. असा मॅसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एआईएडीएमकेच्या एका नेत्यानं म्हटलं आहे की हा पक्षाला बदनाम करण्याचा डाव आहे. अशा संकटाच्या वेळी असे मॅसेज पसरवणं हे दुर्दैवी आहे.
डीएमकेचे अध्यक्ष करूणानिधी यांनी एआईएडीएमकेवर टीका करत म्हटलं की, 'स्टिकर लावण्याच्या कामामुळेच मदत लोकांपर्यंत उशिराने पोहोचली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.