भाजप जबरदस्तीनं धर्मांतरणाच्या विरुद्ध - अमित शहा

सक्तिच्या धर्मांतराला भाजपने विरोध केलाय. जबरदस्तीनं धर्मांतर करण्याच्या विरोधात कायदा करण्याची तयारी भाजप सरकार करत असल्याची माहिती भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिली. अशा कायद्यासाठी इतर पक्षांचीही साथ देण्याची तयारी आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केलाय.

Updated: Dec 20, 2014, 02:53 PM IST
भाजप जबरदस्तीनं धर्मांतरणाच्या विरुद्ध - अमित शहा title=

कोच्ची (केरळ) : सक्तिच्या धर्मांतराला भाजपने विरोध केलाय. जबरदस्तीनं धर्मांतर करण्याच्या विरोधात कायदा करण्याची तयारी भाजप सरकार करत असल्याची माहिती भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी दिली. अशा कायद्यासाठी इतर पक्षांचीही साथ देण्याची तयारी आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केलाय.

भाजप अध्यक्ष शाह दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. इथंच त्यांनी मीडियाशी चर्चा केली.   

जबरदस्तीनं धर्मांतर करण्याविरोधात कायदा करण्याची भाजप सरकारची तयारी आहे. कुणालाही जोरजबरीनं धर्मांतर करता येणार नसल्याचं भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं तसेच  इतर पक्षांची साथ देण्याची तयारी आहे का? असा  सवालही त्यांनी यावेळी केलाय. 

जबरदस्तीनं धर्मांतर करण्याच्या विरोधात भाजपची भूमिका आहे... आणि याबद्दल पक्षाला कायदा अंमलात आणण्याच्या तयारी आहे. त्यामुळे, या विधेयकाला तथाकथित धर्मनिरपेक्ष दलांनीही भाजपाला समर्थन करायला हवं, असं अमित शाह यांनी म्हटलंय. या मुद्द्यावर भाजप अल्पसंख्यांक संघटनांशी तयार आहे का? असा प्रश्न विचारला तेव्हा भाजपा अध्यक्षांनी, 'या विषयावर राजकीय दलांमध्य एकमत झाल्यानंतर सार्वजनिक चर्चा केली जाऊ शकते' असं उत्तर दिलंय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.