कोळसा गैरव्यवहार: सीबीआयकडून चौकशी

खाणघोटाळ्याप्रकरणी वादात सापडलेल्या मनोज जायसवाल यांच्या अभिजित ग्रुप कंपनीवर आणखी एका आरोपाची भर पडली आहे. दरम्यान, कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज एमएमआर लोखंड आणि स्टिल कंपनीचे संचालक अरविंद जयस्वाल यांची चौकशी केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 17, 2012, 04:16 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
खाणघोटाळ्याप्रकरणी वादात सापडलेल्या मनोज जायसवाल यांच्या अभिजित ग्रुप कंपनीवर आणखी एका आरोपाची भर पडली आहे. दरम्यान, कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज एमएमआर लोखंड आणि स्टिल कंपनीचे संचालक अरविंद जायस्वाल यांची चौकशी केली.
मनोज जायस्वाल यांच्या अभिजत ग्रूप कंपनीनं झारखंड राज्यातील खरवासा इथल्या १५१ एकर जमिनीवर अवैध कब्जा केलाय. आणि धक्कादायक बाब म्हणजे या वादाच्या भोव-यात झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडाही अडकले आहेत.
अर्जुन मुंडा यांनी या प्रकरणात जायस्वाल यांना मदत केलीये. डीएनए या इंग्रजी दैनिकानं हा खळबळजनक खुलासा केलेला आहे. राजकारणी आणि उद्योगपतीच्या या जोडगोळीने एक दोन नव्हे तर तब्बल १५१ एकर जमीन बळकवल्याचा गौप्यस्फोट डीएनए या इंग्रजी दैनिकान केलाय.
मनोज जायस्वाल यांच्या अभिजीत ग्रुप कंपनीवर अवैध मार्गाने मोठ्या रक्कमेचं कर्ज काढल्याचाही आरोप आहे आणि त्या आरोपात आणखी भर पडलीय. डीएनए या दैनिकाच्या वृत्तानुसार झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी २००४ साली सर्व नियमांना बगल देत मनोज जायस्वाल यांच्या कंपनीला कोळसाखाण कंत्राट मिळवून देण्यासाठी मदत केली होती.
मनोज जायस्वाल यांच्या सीएआयएल कंपनीला कोळसा खाण कंत्राट मिळावं, म्हणून मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी कोळसा मंत्रालयाला शिफारस पत्र दिलं असल्याच्या धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
मनोज जयस्वाल आणि अर्जुन मुंडां हे एवढ्यावरच थांबले नाहीत तर २००८ मध्ये त्यांनी कंत्राट मिळालेल्या कोळासा खाण क्षेत्राचा आवाका देखील वाढवून घेतला.
मनोज जायस्वाल यांच्या CIAL कंपनीने मुंडा यांच कार्यक्षेत्र समजल्या जाणा-या खरवसा इथे स्टील प्लांट सुरू करण्यासाठी सर्व सोपस्कर पूर्ण करून घेतले आणि त्यासाठी खरवसा इथल्या १५१ एकर जमीनीवर अवैध कब्जा मिळवला, असे वृत्तात म्हटले आहे.