18, 19 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी आहे की नाही? शिक्षण विभागाने अखेर केलं स्पष्ट

Maharashtra Schools: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूनीवर शाळा तीन दिवस बंद असतील अशीही चर्चा सुरु आहे.    

शिवराज यादव | Updated: Nov 15, 2024, 09:45 PM IST
18, 19 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी आहे की नाही? शिक्षण विभागाने अखेर केलं स्पष्ट title=
(File Photo: PTI)

Maharashtra Schools: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. दरम्यान निवडणुकांच्या पार्श्वभूनीवर शाळा 18.19 आणि 20 नोव्हेंबर असे तीन दिवस बंद असतील अशीही चर्चा सुरु आहे. मात्र शालेय शिक्षण विभागाने हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. 18 व 19 रोजी सर्व शाळा सुरू राहतील. कोणतीही सार्वत्रिक  सुट्टी जाहीर केलेली नाही असं शालेय शिक्षण विभागाने सांगितलं आहे. 

शालेय शिक्षण विभागाने काय सांगितलं आहे?

"18 आणि 19 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबत काही संभ्रम निर्माण झाल्याचं दिसत आहे. शासनाने यासंदर्भात परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचना अत्यंत स्पष्ट आहेत. 18 व 19 रोजी सर्व शाळा सुरू राहतील. कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही," असं सांगण्यात आलं आहे. 

"केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही, अशा शाळाबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी अशा सूचना आहेत. अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील. केवळ वरील परिस्थितीतील विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी द्यावी अशा सूचना आहेत," असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

स्कूल बस दोन दिवस इलेक्शन ड्युटीवर

राज्य परिवहन (आरटीओ) विभागाच्या सूचनेनुसार विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी १९ आणि २० नोव्हेंबरला स्कूल बसची आवश्यकता असल्याने या दोन दिवशी या बस विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी न चालविण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र घेतला आहे. मतदानामुळे शाळांना २० तारखेला सुट्टी आहे. मात्र, १९ तारखेला बसअभावी विद्यार्थ्यांना पायपीट करत, अथवा सार्वजनिक बस, रिक्षा, टॅक्सीने शाळेत ये-जा करावी लागणार आहे. या बस १८ नोव्हेंबरलाच रात्रीपासून आरटीओच्या ताब्यात देण्यात येणार आल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी १९ नोव्हेंबरला उपलब्ध करून देणे कठीण 

"ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी. तसंच कोणत्याही शाळा अनावश्यकरीत्या बंद राहणार नाहीत याचीही दक्षता  घेण्याबाबतच्या सूचना सर्व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत," अशी माहिती देण्यात आली आहे.