नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दिल्लीचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.
आज झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. टँकर घोटाळ्याची चौकशी पुढे ढकलण्यासाठी केजरीवालांनी आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप मिश्रा यांनी केला होता.
याचे पुरावे त्यांनी दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सादर केल्याचं सांगितलं जातंय. सकाळीच त्यांनी ACBचं कार्यालय गाठलं. टँकर घोटाळ्यात शीला दीक्षित यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला होता असा आरोपही मिश्रा यांनी केलाय.
पक्षात हिम्मत असेल, तर आपल्याला बडतर्फ करून दाखवावं असं आव्हान मिश्रांनी दिलंय. तर आम आदमी पार्टीनं पुन्हा एकदा हे आरोप फेटाळले असताना सत्येंद्र जैन यांनी प्रथमच मीडियासमोर येत मिश्रांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय...