नवी दिल्ली : आपचे आमदार आणि माजी कायदे मंत्री सोमनाथ भारती यांनी पोलिसांना सरेंडर करावं, असं ट्वीट आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
सोमनाथ भारती यांच्यावर त्यांची पत्नी लिपिका मित्रा यांनी घरगुती हिंसा आणि शोषणाचा आरोप केला आहे, मित्रा यांनी द्वारका पोलीस ठाण्यात १० जून रोजी तक्रार दाखल केली होती.
अंतरिम जामिनाची याचिका फेटाळल्यानंतर भारती यांच्या वकिलाने म्हटलं होतं की, ते सुप्रीम कोर्टात आपली याचिका दाखल करणार आहेत.
हायकोर्टाने अंतरिम जामीनाची याचिका फेटाळल्यानंतर सोमनाथ भारती यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
मागील आठड्यात दिल्ली हायकोर्टाने म्हटलं होतं की, जोपर्यंत याचिकेवर शेवटचा निर्णय येत नाही तोपर्यंत त्यांना पोलिस अटक करू शकत नाहीत, पण आता भारती यांची याचिका फेटाळण्यात आली आहे.
या निर्णयाला सोमनाथ भारती सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहेत, त्या आधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमनाथ भारती यांना सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.