नवी दिल्ली: पुन्हा एकदा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेल्याची चर्चा आहे. राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर गेलेय. सूत्रांनुसार यावेळी राहुल एक आठवड्याच्या सुट्टीवर आहेत. यावेळी राहुल गांधी लंडनला गेल्याचं कळतंय.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेले आहेत, पण पक्षानं याबाबत काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहे. जेव्हा पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना याबाबत विचारलं गेलं तेव्हा त्यांनी गोलगोल बोलत प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवालानं सांगितलं की, राहुल गांधी वैयक्तिक कामानं बाहेर गेले आहेत. ते पक्षाचं मार्गदर्शन करतात, पुढेही करत राहणार. राहुल गांधी याच वर्षी संसदेचं बजेट अधिवेशन सुरू असतांना जवळपास दोन महिन्यांसाठी सुट्टीवर बँकॉकला गेले होते. भाजपसह सर्वच पक्षांनी याबाबत राहुल गांधींवर टीकाही केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.