सातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार पुढील महिन्यापासून

 गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात खूप मोठी खुशखबर मिळाणार आहे. सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार पुढील महिन्यात वाढीव पगार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. 

Updated: Jun 2, 2016, 02:34 PM IST
सातवा वेतन आयोग :  केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार पुढील महिन्यापासून title=

नवी दिल्ली :  गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात खूप मोठी खुशखबर मिळाणार आहे. सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार पुढील महिन्यात वाढीव पगार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. 

मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, नवीन वाढीव पगार हा पुढील महिन्यापासून देण्यात येणार आहे. 

या संदर्भात केंद्रीय सचिवांच्या गटांची बैठक येत्या ११ जूनला होणार असून याचे नेतृत्व कॅबिनेट सचिव पी के सिन्हा करीत आहेत. त्यावळी ते सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींना अंतीम रूप देणार आहे. 

सरकारने गेल्या जानेवारीमध्ये पी के सिन्हा यांच्या नेतृत्त्वाखाली उच्च स्तरिय समिती स्थापन केली.  ही समिती सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींचे विश्लेषण करणार आहे. सातव्या वेतन आयोगाचा फायदा ४७ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ५२ लाख पेन्शनरला होणार आहे.