www.24taas.com, झी मीडिया, इंदौर
इंदौरमध्ये एक आश्चर्यजनक घटना घडलीय. नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊन एका ६० वर्षीय महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरचं घडलयं.
जे वय नात-नातींना खेळवण्याचे असते त्या वयात नैसर्गिक गर्भधारणा होऊन एका ६० वर्षाच्या महिलेनं शासकीय महाराजा यशवंतराव चिकित्सालयात मुलीला जन्म दिलाय. हॉस्पीटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गायत्री मथुरिया यांच्या म्हणण्यानुसार, ६० वर्षाच्या लीलाबाई यांचं ४५ मिनिटे सिझेरियन ऑपरेशन झालं ज्यात त्यांनी एका मुलीला जन्म दिलाय. त्यांची आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे. या वयात कृत्रिम पद्धतीने गर्भधारणा होऊन बायका आई बनण्याचं सुख मिळवू शकतात. मात्र, लीलाबाई याला अपवाद आहेत. त्यांना या वयातही र्नेसर्गिक पद्धतीनंच गर्भधारणा झाली.
लीलाबाई यांच्या पतीचं वय ६५ वर्ष आहे. याआधी या जोडप्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. या महिलेच्या पोटाचा आकार वाढत असल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्याची मेडिकल तपासणी केली होती. तपासणीनंतर त्या गर्भवती असल्याचे आढळून आलं होतं त्यावेळी खरं तर हा या जोडप्यासाठीही धक्काच होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.