भारताच्या या ५ पावलांमुळे जगाच्या नकाशातून गायब होऊ शकतो पाकिस्तान

उरी दहशतवादी हल्ल्यामध्ये भारत सरकार काही कडक पाऊलं उचलण्याचा विचार करत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानची करतूत समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात आता कडक पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे.

Updated: Sep 19, 2016, 02:42 PM IST
भारताच्या या ५ पावलांमुळे जगाच्या नकाशातून गायब होऊ शकतो पाकिस्तान title=

नवी दिल्ली : उरी दहशतवादी हल्ल्यामध्ये भारत सरकार काही कडक पाऊलं उचलण्याचा विचार करत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानची करतूत समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात आता कडक पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे.

१. पाकिस्तानला आता उत्तर देण्याची वेळ आल्याचं अनेकांकडून म्हटलं जातंय. लश्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्‍बुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांना पीओकेमध्ये थारा दिला जात असल्याचं सुरक्षा यंत्रणांचं म्हणणं आहे. पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा आयएसआय आणि पाकसेना यांच्या मदतीने येथे १७ दहशदवादी कॅम्प सुरु असल्याचं म्हटलं जातंय. यामध्ये १७०० दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जातंय.
 
२. पाकिस्तानने भारताचा नेहमी विश्वासघात केला आहे. पाकिस्तान ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं तरच ते ठिकाण्यावर येतील आणि अशा कारवाया थांबवतील असं म्हटलं जातंय.

३. अमेरिकेला देखील माहित आहे की पंतप्रधान मोदी हे आधीच्या पंतप्रधानांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे भारतात अमेरिकेचे राजदूत राहिलेले राबर्ट ब्लॅकविल यांचं म्हणणं आहे की, राजकीय परिस्थितीत पंतप्रधान मोदी सैन्याचा वापर करु शकते. 

४. जर कोणताही मोठा हल्ला होतो आणि तो जर पाकिस्तानशी संबंधित असेल तर मोदी सैन्याच्या मदतीने त्यांना धडा शिकवू शकतात. मोदींचं व्यक्तीमत्व हे भारतीय लोकांच्या भावना लक्षात घेता मोदी हे सैन्याचा वापर करतील असं अनेकांचं मत आहे.

५. पाकिस्तानच्या भारत विरोधी कारवाया या सुरुच असतात. दहशतवाद्यांना ते पाकिस्तानात थारा देतात आणि त्यांचं समर्थन देखील करतात. पण हेच आता पाकिस्तानसाठी देखील धोकादायक ठरत चाललं आहे. ती वेळ लांब नाही जेव्हा पाकिस्तानलाच याची चांगली किंमत मोजावी लागेल.